Breaking News
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन
पनवेल : विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना त्या क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यू साठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचं स्वरूप काय आहे, ड्युटीची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात, तुमच्या आत्मविश्वासावर, बोलण्याच्या कलेवरती आणि शिक्षणावर तुमचं सिलेक्शन होतं अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केलात तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता असे मान्यवरांनी सांगितले. यामध्ये सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युटिव्ह, एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट), रुद्राश गोवारी(एअर इंडिया, गोवा एअरपोर्ट) वसीम सर (फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी) यांनी मार्गदर्शन केले.
नवी मुंबई विमानतळ चालू झाल्यावर मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हेच आमचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचे प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले. पनवेल-उरणच्या पासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई विमानतळाचे काम जोरदार सुरु आहे. आणि अशा ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या ठिकाणी आपली माणसे, आपले स्थानिक लोकाना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखठोक भूमिका प्रितम म्हात्रे यांनी घेतली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai