पालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 22, 2024
- 321
नवी मुंबई ः "स्वत:साठी व समाजासाठी योग" या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा झाला. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह नमुंमपा अधिकारी कर्मचारी यांनी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झालेल्या "योग मंत्रा" या विशेष कार्यक्रमात सहभागी होत योग दिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आ.गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे, माजी आयुक्त विजय नहाटा व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने योगविषयक विविध उपक्रमांचे शालेय व खुल्या पातळीवर आयोजन करीत असते. अशाच प्रकारे सिडको एक्झिबिशन सेंटर येथील योग मंत्रा या विशेष कार्यक्रमात योगाभ्यासाचे महत्व जनमानसात प्रसारित होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने सहभागी होत या उपक्रमाच्या यशस्वितेत योगदान दिले. या माध्यमातून ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 बाबत स्वच्छता संदेशाचाही प्रसार करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, विधी विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिलारे, इतर अधिकारी, कर्मचारी यांनी योगप्रकार करीत आत्मिक शांती आणि समाधानाचा लाभ घेतला.
आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना ही अत्यंत महत्वाची असून आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येकाने यापुढील काळात नियमित योग करण्याचा संकल्प करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai