Breaking News
मुंबई ः नीट पीजी 2024 परीक्षेची नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा आता 11 ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना एनबीईएमएसकडून जारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट पीजी 2024 या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार आता 11 ऑगस्ट रोजी दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
11 ऑगस्ट रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. नीट पीजी 2024 ची परीक्षा 23 जून रोजी होणार होती. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भातील अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai