Breaking News
उरण ः वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलने करित आहेत पण अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी 9 जुलै रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केले.
विधी मंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला. फक्त किमान वेतन रू 14 ते 15 हजारावर कायम कामगारांच्या प्रमाणेच, रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवुन फक्त कायम कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी 9 जुलै रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केले. या सरकार जगाव आंदोलनात मात्र उर्जा मंत्री, कंपनी प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघअध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे. अवर प्रधान सचिव ऊर्जा व कामगार यांनी मीटिंग घेऊन तोडगा काढावा ऊर्जामंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर, प्रदेश सहसचिव ऍंड. विजय मोहिते यांनी मार्गदर्शन करून वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असून लवकरच कंत्राटी कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ, बाबतीत प्रयत्न चालू आहेत असे नमुद केले आहे.
संघटनेच्या मागण्या
1) कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कामगारांना कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा
2) कायम कामगारांच्या प्रमाणे कंत्राटी कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ करावी
3) दोषी कंत्राटदारांना ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी.
4) आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे.
5) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी.
6) भरती मध्ये वयात आरक्षण व मार्क द्यावे
7) अनुसूचित 47 विविध ऊद्योगातील किमान वेतन सुधारणा बाबतीत त्वरित घोषित करून प्रलंबित वाढ फरका सहित देण्यात यावी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai