‘प्लास्टिकमुक्त शाळा' उपक्रमात 1200 किलो प्लास्टिक जमा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 421
नवी मुंबई ः स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही नवी मुंबई पालिकेच्या वतीने लक्ष दिले जात असून जनजागृती प्रमाणेच विविध प्रकारच्या मोहीमा राबविल्या जात आहेत. अशाच प्रकारचा ‘प्लास्टिकमुक्त शाळा' हा अभिनव उपक्रम नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये राबविण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली 88 शाळांतील 5 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत उत्साही सहभाग घेत प्लास्टिक बाटल्यांच्या स्वरुपातील तब्बल 1200 किलो प्लास्टिक जमा केले. या बाबतच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी निसर्गाला हानीकारक प्लास्टिक रोखण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी आपल्या घरुनच प्लास्टिक बाटल्या गोळा करुन शाळेत आणल्या. संबधित वर्ग शिक्षकांमार्फत शालेय पातळीवर मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या प्लास्टिक बाटल्यांचे शाळानिहाय संकलन करण्यात आले. या संकलित प्लास्टिक बाटल्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शाळांमधून जमा करुन तुर्भे एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी पुढील प्रक्रियेसाठी नेले जाणार आहेत.
‘प्लास्टिकमुक्त शाळा' या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर प्लास्टिक प्रतिबंधाचे संस्कार लहानपणापासूनच करण्यात येत असून या माध्यमातून नवी मुंबईचे स्वच्छ सुंदर व पर्यावरणशील भविष्य घडविण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai