विमानतळ प्रकल्पात दिवसाला 50 स्फोटांचे नियोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 10, 2024
- 380
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांचा विरोध मावळला
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत विमानतळावरुन पहिले विमानउड्डाण होण्यासाठी युद्धपातळीवर दिवसरात्र काम होत आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकल्पाचे काम सूरु असलेल्या ठिकाणी धडाधड झालेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांनी स्फोटकाचे काम रोखून धरले. पोलीसांनी संतापलेल्या ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर त्याच बैठकीत स्फोटांचे नियोजन आखून दिल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत ओवळे गावातील काही ग्रामस्थांनी त्यांच्या हक्काचे भूखंड न मिळाल्याने त्यांनी घर रिकामी केले नसल्याने काही कुटूंबे अजूनही त्याचठिकाणी राहतात. ग्रामस्थांना मिळणारे भूखंड त्यांच्या सोयीनूसार ताब्यात द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यामुळे काही ग्रामस्थांना प्रकल्पाच्या नुकसानी पोटी मिळणारे भूखंड अजूनही मिळू शकले नाही. त्यामुळे विमानतळ प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर सुरुंग स्फोटाचे हादरे बसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
ओवळे ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी विमानतळ गाभाक्षेत्राच्या बाहेर ओवळे गावच्या पाठीमागे विमानतळाच्या प्रशासकीय कार्यालय ज्याठिकाणी उभारले जाणार आहे त्या लहानटेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी स्फोट केले जात होते. ग्रामस्थांनी या स्फोटांना विरोध केल्यामुळे पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने ओवळे गावात धाव घेऊन संतापलेल्या गावकरी व सिडको अधिकारी यांच्यात बैठक लावून हा प्रश्न संवादाने सोडविला. काही दिवसात शेवटचे 400 स्फोट करायचे असल्याने दरदिवशी सकाळी 25 व सायंकाळी 25 असे 400 सुरुंग स्फोट करण्याचे ठरल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. त्यामुळे पुढील काही दिवसात ओवळे गावामागील लहान टेकडी भूईसपाट केली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai