Breaking News
पनवेल : पनवेल महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सूचना व हरकतींसाठी 7 सप्टेंबर ही अंतिम तारीख जाहीर असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत 6 हजार 393 हरकती व सूचना पालिका प्रशासनाकडे आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पनवेलच्या प्रारूप विकास आराखड्यात शेतजमिनींच्या मालकांना विकासक बनविण्याची संधी मिळाली असल्याने सुरुवातीला 15 दिवस पालिकेच्या नगर रचना विभागाकडे हरकती व सूचना कमी प्रमाणात प्राप्त झाल्या. मात्र भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय तसेच झोपडपट्टी भागांमध्ये बैठका घेतल्यानंतर शेतकऱ्यांसह अनेक गुंतवणूकदार आणि प्रत्येक झोपडपट्टीधारकांनी या प्रारूप विकास आराखड्यात त्यांचे मत नोंदविल्याचे समजते. लवकरच या सर्व हरकती व सूचना वेगवेगळ्या केल्यानंतर पालिकेने विकास आराखड्यात स्थापन केलेली समिती त्या हरकतींवर सुनावणी घेणार आहे.
पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रारूप विकास आराखडा जाहीर केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना ज्या हरकतींवर खरंच सुधारणा करता येतील किंवा आराखड्याविषयी काही सकारात्मक सूचना असल्यास त्यावर समिती नक्की गांभीर्याने विचार करेल, असेही त्यावेळी आयुक्त चितळे यांनी स्पष्ट केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai