डबेवाल्यांसह चर्मकारांना बाप्पा पावला
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 14, 2024
- 499
25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली. त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.
- डबेवाल्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प कसा असणार?
मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिॲलिटीकडून 30 एकर जागा देण्यात आली आहे. नमन बिल्डर्सकडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे. नमन बिल्डर्सकडून ‘ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai