सातव्या दिवशी 3086 बाप्पांना भावपूर्ण निरोप
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 18, 2024
- 654
नवी मुंबई ः महापालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम विसर्जनस्थळी केलेल्या सुसज्ज विसर्जन व्यवस्थेमध्ये सातव्या दिवशी 3086 श्रीगणेशमूर्तींना भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात भावपूर्ण निरोप दिला. यात 333 शाडूच्या मूर्तींचा समावेश होता. 137 कृत्रिम विसर्जन तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या 591 पर्यावरण जागरूक नागरिकांनाही कापडी पिशव्यांचे वितरण करून गौरविण्यात आले.
सर्वच विसर्जन स्थळांवर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी विविध सोयी पुरविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांना विसर्जनस्थळी निरोपाची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबलची पुरेशा संख्येने मांडणी करण्यात आलेली होती. निर्माल्य टाकण्यासाठी ओल्या व सुक्या स्वतंत्र निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ते संकलित निर्माल्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय कचरामुक्तीच्या दिशेने आणखी पुढचे पाऊल उचलत मुख्य विसर्जनस्थळांवर फोर आर च्या अनुषंगाने चार डबे ठेवून जागरूकता करण्यात आली. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था होती तसेच आवश्यक विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था करण्यात आली होती. नैसर्गिक विसर्जन स्थळापासून नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांमार्फत कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष होते. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2341 घरगुती तसेच 154 सार्वजनिक मंडळांच्या 2495 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 137 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 588 घरगुती तसेच 3 सार्वजनिक मंडळांच्या 591 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 2495 घरगुती व 591 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 3086 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 333 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
यापुढील विसर्जन सोहळा मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून यादिवशी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने नवी मुंबई महापालिकेची सर्व विसर्जन स्थळांवर असणारी यंत्रणा आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षमतेने कार्यरत असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. वाहतुक पोलीस विभागाच्या वतीनेही वाहतुकीविषयी सूचना प्रसारित करण्यात येतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai