Breaking News
मुंबई : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल(सोमवारी) मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. अशातच या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तपास करणार आहे. अधिकाऱ्यांनी आज(मंगळवारी)सांगितले की, फॉरेन्सिक तज्ञांच्या पथकाने पोलिस वाहनाची तपासणी केली. ज्यात शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी सोमवारी संध्याकाळी एका पोलिसाने गोळी झाडली. शिंदे (24) याच्यावर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बदलापूरच्या एका शाळेतील सफाई कामगार शिंदे याला शाळेच्या शौचालयात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या पाच दिवसानंतर 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी संध्याकाळी अक्षय शिंदेला त्याच्या पत्नीने नोंदवलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलिस वाहनात नेले जात असताना, त्याने एका पोलिसाचे रिव्हॉल्व्हर घेतले आणि गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, परिणामी त्याचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस कोठडीतील मृत्यूशी संबंधित असल्याने त्याचा तपास महाराष्ट्र सीआयडी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीआयडी अधिकाऱ्यांचे पथक जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी वाहनात उपस्थित असलेल्या पोलिसांचे जबाबही ते नोंदवणार आहेत. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचेही जबाब सीआयडी अधिकारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदेचा मृतदेह आज (मंगळवारी) सकाळी ठाण्यातील कळवा नागरी रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आला.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येत असून त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी आपल्या मुलाच्या कथित हत्येचा तपास करण्याची मागणी केली आहे. अक्षयने प्रथम पोलिसावर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले, परिणामी त्याचा मृत्यू झाला, या पोलिसांच्या दाव्याला त्याच्या कुटुंबीयांनी आव्हान दिले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai