पालिकेला मिळणार 9 कोटींचे बक्षिस
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2024
- 548
माझी वसुंधरा अभियान अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय तर क वर्ग मध्ये प्रथम ; भूमी थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या "माझी वसुंधरा अभियान 4.0" मध्ये नवी मुंबई महानगरपालिका 10 लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात राज्यस्तरावर 'द्वितीय क्रमांकाची मानकरी' ठरलेली आहे. राज्यातील "क"वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची कामगिरी ‘सर्वप्रथम क्रमांकाची' आहे. याशिवाय "भूमी थीमॅटीक" कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महापालिकेस राज्यस्तरीय उच्चतम कामगिरीचे विशेष पारितोषिकही जाहीर झाले आहे.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाला समर्पित केला असून पर्यावरण विषयक नानाविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारे पर्यावरणप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था - मंडळे त्याचप्रमाणे स्वच्छता, उद्यान व विविध विभागांतील कर्मचारी आणि प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहभागामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या यशाबद्दल आयुक्तांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत मौलिक सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या 5 घटकांवर आधारित "माझी वसुंधरा अभियान 4.0" हे 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील 414 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 22218 ग्रामपंचायत अशा एकूण 22632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला. माझी वसुंधरा अभियान 4.0 चे मूल्यमापन कागदपत्र तपासणी आणि प्रत्यक्ष भेटी देऊन क्षेत्रीय मूल्यमापन याद्वारे करण्यात आले. यामध्ये दहा लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या गटात नवी मुंबई राज्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तसेच भूमी थीमॅटिक कॅटेगरीमध्ये नवी मुंबई राज्यात सर्वोत्तम ठरली. पुरस्कारापोटी नवी मुंबई महानगरपालिकेस अमृत गटातील द्वितीय पारितोषिकाकरिता रुपये 7 कोटी व भूमी थीमॅटीकमधील उच्चतम कामगिरीबद्दल रुपये 2 कोटी अशी एकूण 9 कोटी बक्षीस रक्कम प्राप्त होणार आहे. यामधून शासनाने दिलेल्या निकषांनुसार शहरात पर्यावरणपूरक बाबींसाठी खर्च केला जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai