121 ज्येष्ठ नवी मुंबईकर श्रीराम मंदिर अयोध्येकडे रवाना
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2024
- 439
नवी मुंबई ः मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना योजने अंतर्गत निवड झालेल्या ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा समुह शुक्रवार श्रीराम मंदिर अयोध्या याठिकाणी रवाना झाला असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून 121 लाभार्थी ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेकरिता अयोध्येला गेले आहेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर झाल्यानंतर त्याचा लाभ 60 वर्षावरील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजविकास विभागामार्फत विविध माध्यमांतून योजनेचा प्रभावी प्रचार करण्यात आला. यादृष्टीने नमुंमपा मुख्यालयात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालयांमध्ये व ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे याठिकाणी योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले.
याव्दारे महानगरपालिकेकडे 231 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज संकलित झाले. हे अर्ज सहा.आयुक्त, समाजकल्याण विभाग, ठाणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. तेथील छाननीअंती 213 अर्ज पात्र ठरले. यामधून श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थ दर्शनाकरिता जाण्यासाठी 152 अर्जदारांची निवड झाली. सदर 152 पात्र लाभार्थ्यांशी समाजविकास विभागाने संपर्क साधला व त्यांची अयोध्या येथे जाण्यासाठी संमती घेतली. अशा 152 पात्र लाभार्थ्यांपैकी 121 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी अयोध्येकडे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेत रवाना झाले आहेत.
या लाभार्थ्यांना नवी मुंबईतील 4 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी एकत्र येण्याचे सूचित करण्यात आले होते. प्रत्येक बससोबत समाजविकास विभागाने समन्वयकाची नियुक्ती केली होती. या बसेसमधून नवी मुंबईतील 121 लाभार्थी ज्येष्ठ नागरिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे गेले व तेथून पुढे ठाणे जिल्ह्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांसमवेत रेल्वेने अयोध्येकडे तीर्थयात्रेला निघाले. या यात्रेकरुंसमवेत जिल्हा समाज कार्यालयांमार्फत नियुक्त 13 स्वयंसेवक असणार असून सदर लाभार्थ्यांचे वय 60 वर्ष व त्यापुढील असल्याने नमुंमपाचे डॉक्टरांसह 3 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथकही त्यांच्यासोबत अयोध्येला रवाना झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai