बेलापुरमध्ये मंदा म्हात्रे यांच्या विजयाची तुतारी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 23, 2024
- 475
आ. मंदा म्हात्रे यांची हॅट्रिक
नवी मुंबई ः राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापुर मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले हेोते. अत्यंत चुरशीची ठरलेल्या या मतदासंघात पंचरंगी लढत झाली होती. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि बंडखोरी केलेले संदीप नाईक यांच्यात काटे की टक्क्कर पाहायला मिळाली.अखेर आज निकालाच्या दिवशी आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना 377 मतांनी पराभुत करुन हॅट्रिक केली आहे. त्यामुळे बेलापुर मतदार संघात मंदा म्हात्रे यांच्या विजयाची तुतारी वाजत आहे.
बेलापूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. सन 2014 व 2019 च्या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी भाजपच्या तिकीटावरच येथून विजय मिळवला. म्हात्रे यांनी केलेल्या विकासकामांमुळे 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली. त्या संधीचे सोने करत म्हात्रे यांनी हॅट्रिक केली आहे. बेलापूर या मतदारसंघातून मनसेचे गजानन काळे, अपक्ष म्हणून विजय नाहटा, तर भाजपमधून बंडखोरी केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी मिळवलेले संदीप नाईक यांच्यात लढत झाल्याने मंदाताईंसमोर मोठे आव्हान उभे होते. मात्र अखेर ताईंनी हा बालेकिल्ला जिंकला असून 300 मताधिक्याने आघाडी घेत आपल्या विजयाची तुतारी वाजवून कमळ फुलवले आहे.
या मतदार संघात 2009 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईकांनी भाजपच्या सुरेश हावरे यांचा पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचा म्हणजेच संदीप नाईक यांच्या वडिलांचा पराभव केला. 2014 मध्ये म्हात्रे यांना 55 हजार 316 तर नाईकांना 53 हजार 825 मते मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामुळे बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे विरुद्ध राष्ट्रवादीचे अशोक गावडे अशी लढत पाहायला मिळालेली. या लढतीत म्हात्रे यांनी 87 हजार 858 मते मिळवली तर गावडे यांना 44 हजार 261 मते मिळाली होती. तर आता पुन्हा 2024 मध्ये नाट्यमय घडामोडी या मतदार संघात पाहायला मिळाल्या. भाजपच्या संदीप नाईक यांनी ऐनवेळी बंडखोरी करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उमेदवारी मिळवून ताईंसमोर मोठे आव्हान उभे केले हेोते. मात्र अखेर विजयश्री खेचत आणून बेलापुरमध्ये आ. मंदा म्हात्रे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मंदा म्हात्रे 91852
संदीप नाईक 91475
विजय नाहटा 19646
गजानन काळे 17704
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai