Breaking News
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ
मुंबई ः मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना (मराठा) कोट्या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यापूव, विद्यार्थ्यांना त्यांची स्थिती वरून मध्ये बदलण्यासाठी तीन महिन्यांची देण्यात आली होती, परंतु 1400 विद्याथ प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरले. त्यांना आता दिलासा मिळाला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा समाजातील मुलांनी अभियांत्रिकी वा इतर तत्सम अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवला होता. पण राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे बंद केले होते. त्याऐवजी त्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
त्यातच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांना ईडब्ल्यएस प्रमाणपत्राची सक्ती केली होती. या सर्व प्रकारामुळे विद्याथ अडचणीत सापडले. याविषयीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असे आश्वासन यापूव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai