Breaking News
पनवेल ः महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा व वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत चारही प्रभागामध्ये एकूण 447 जप्तीपूर्व नोटीसांचे वाटप केले असून 27 वॉरंट बजावण्यात आले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील चारही प्रभागामधील सुमारे 3 लाख 50 हजार मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत 314.5 कोटी इतकी वसुली झाली आहे. त्यानुसार मालमत्ता कर उपायुक्त व सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे व जप्ती पथकामधील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या अधीनस्त असलेल्या सर्व मालमत्ताधारकांना प्रवृत्त करुन लवकरात लवकर महानगरपालिकेस मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणी कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 128 व अनुसूची ड प्रकरण 8 कराधान नियम 47 अन्वये महानगरपालिकेस देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करणेची तरतूद महानगरपालिकेस आहे. त्यानूसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्त व सहाय्य्क आयुक्त यांच्या सूचनेनूसार, कर अधीक्षक महेश गायकवाड व करअधीक्षक सुनिल भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर, उपविभाग नावडे, कळंबोली कामोठे, पनवेल व नविनपनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात येत आहेत.
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी “ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच . या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai