जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 14, 2025
- 433
मुंबई : दशावतारी नाट्य महोत्सव नवी मुंबई मधील जुईनगर बॉम्बे बंट्स असोसिएशन, येथील सभागृहात दि. 13 ते 18 फेब्रुवारी 2025, या कालावधीत आयोजन करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्रीं कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, यांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार नाट्य महोत्सव आयोजन करण्यात आला आहे. दशावतार ही कोकणातील एक पारंपारिक लोकनाट्य शैली आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला विशेष लोकप्रिय आहे.
जुईनगर, नवी मुंबई येथे दशावतार नाट्य महोत्सव दि. 13 ते 18 फेब्रुवारी 2025, या कालावधीत रोज सायंकाळी 6:30 वाजता बॉम्बे बंट्स असोसिएशन, सभागृहात आयोजित करण्यात येत आहे. गुरुवार, दि. 13 फेब्रुवारी 2025 सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर शुक्रवार, दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी श्री देवेंद्र नाईक चेंदवणकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण्यांचा नाट्य प्रयोग होईल रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2026 जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, ओरोस यांचा नाट्यप्रयोग होईल. सोमवार, दि. 17 फेब्रुवारी 2025 आरोलकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, अखली व ओंकार दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा नाट्य प्रयोग होईल मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मानखुर्द व तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ झाराप यांच्या नाट्य प्रयोगाने या दशावतारी नाट्य महोत्सवाचा समरोप होईल. हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या दशावतारी नाट्य महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा, नाट्य-नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन विभूषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai