Breaking News
मालमत्ता करातून 1200 कोटीचे उद्दिष्ट; अत्याधुनिक प्रणालींचा वापर
नवी मुंबई ः पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विशेष कार्यबलाद्वारे उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात येणार असून मालमत्ता कराच्या वसूलीसाठीही ठोस उपाययोजना केली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक मालमत्तांचे सर्वेक्षण, जाहीरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणे, व्यावसायितक दुकाने भाडेतत्वावर देणे, कॅशफ्लो पद्धतीचा अवलंब अशा विविध मार्गाने पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी भर देण्यात आला आहे.
शहराच्या चांगल्या आर्थिक स्थितीसाठी उत्पन्नवाढ, निदीचा योग्य विनियोग व दायित्व मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. या बाबींचा वितार करुन अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना करता याव्यात यासाठी विशेष कार्यबलाची नियुक्क्ती केली आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. प्रलंबित मालमत्ता कराची वसूली प्रभावीपणे होण्यासाठी विशेष पथके तयार केली असून थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवणे, मालमत्ताचा लिलाव करणे ही कारवाई केली जाते. गतीमान व प्रभावी वसूलीकरिता एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात यंदा प्रथमच मालमत्ता कराच्या माध्यमातून 900 कोटी रुपये तिजोरीत जमा होतील, असा दावा आयुक्तांनी केला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत मालमत्ता कराची 635 कोटी रुपयांची वसुली झाली असून गेल्या वषच्या तुलनेत हा आकडाही अधिक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. लिडार सर्वेक्षणाचा यासाठी मोठी मदत होणार असून पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 1200 कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी महापालिकेने गेले वर्षभर लिडार सर्वेक्षणाच्या माध्यमातून नव्या मालमत्तांचा शोध सुरू केला होता. या शोध मोहीमेनंतर तब्बल 45 हजार नव्या मालमत्तांचा शोध घेण्यात महापालिकेस यश मिळाले आहे. शिवाय पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करातून 1200 कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. जाहीरात माध्यमांचा वापर करणाऱ्या आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर जाहीरात फलक, निऑन साईन व ग्लोसाई बोर्डधारकांकडून पालिकेस अंदाजे 19 कोटी वार्षिक उत्पन्न प्राप्त होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे विदद्युत खांब, शहरातील विविध ठिकाणी एलईडी जाहीरात, जाहीरात गॅन्ट्री व डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून अंदाजे 8 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
जमा-खर्चाचे गणित योग्य पद्धतीने राखले जावे यासाठी कॅशफ्लो पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब केला जाणार आहे. पालिकेतील सर्व संबंधित विभागांनी अर्थसंकल्पात दिलेले जमा आणि खर्चाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरमहा जमेचा आणि खर्चाचा कॅशफ्लो ठरवून दिला जाणार आहे. विभागांच्या विविध कर आणि करेत्तर जमेनुसार खर्चाचे उद्दिष्ट ठरवून देऊन प्रत्येक विभागाने काम करावे असा नियम या माध्यमातून आखला जाणार असून महिन्याला अपेक्षित खर्चाची आकडेवारी घेऊनच त्यानुसार महापालिका निधी खर्चासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विकास कामांच्या निमित्ताने उभे रहाणारे दायित्व मर्यादित ठेवण्यासाठी ते मूळ तरतुदीपेक्षा दीड पट वाढू नये अशा पद्धतीचा नियम आखून घेतला जाणार आहे. या मर्यादेच्या आतमध्येच नवीन कामे मंजूर केली जातील, असा दावा आयुक्तांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस