दिवाळे गावात स्मशानभूमीचे भूमिपूजन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 261
नवी मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून दिवाळे गावात असलेली स्मशानभूमी निकृष्ट दर्जाची झाली होती. याचं अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व सोई सुविधायुक्त व सुसज्ज अशी स्मशानभूमी व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या मागणीची दखल घेत अखेर त्या ठिकाणी आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून 5 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध करुन सुसज्ज व सर्व सुविधायुक्त स्मशानभूमीचे भूमिपूजन संपन्न झाले.
दिवाळे व आजूबाजूच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता या ठिकाणी उत्तम दर्जाचे दहन शेड, प्लॅटफॉर्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, भांडार खोली, प्रसाधनगृह, सुरक्षारक्षक केबीन तसेच इतर सोयी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी दिवाळे गावात सुरू असलेल्या नवोदित विकास कामांची पाहणी देखील यावेळी केली. तसेच येथील ग्रामस्थांना भेडसावत असणाऱ्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेतल्या. व त्याच्यावर लवकरात लवकर काम करण्याचे आदेश दिले.
शहराच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागांचाही विकास व्हावा व त्याचा दर्जा टिकून राहावा याकरिता आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. याच उद्देशाने दिवाळे गावात रस्ते, पाणी, वाहनतळ व्यवस्था, नागरिकांसाठी उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा प्रकारच्या सुविधा दिवाळे गावात उपलब्ध झाल्यात. दिवाळे गाव जसं स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने जात आहे त्याचप्रमाणे इतरही ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळेस म्हात्रे यांनी ग्रामस्थांना दिले. तसेच ग्रामस्थांनीही दिवाळे गावात नवीन सुसज्ज अशी स्मशानभूमी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai