स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागाचे नागरिकांना आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 425
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असताना सर्वेक्षणात सातत्याने लाभत असलेल्या उच्च मानांकनामुळे नवी मुंबईसह देशातील 3 शहरांचा ‘सुपर स्वच्छ लीग’ हा विशेष गट यावष जाहीर करण्यात आलेला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांनी अधिक जागरूक होऊन कृतीशील सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करतानाही नवी मुंबईच्या मानांकनाचे श्रेय नागरिकांना देतानाच आपल्या वाढत्या जबाबदारीचे भानही आयुक्तांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे विभागवार नेमलेल्या पालक अधिकारी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नियमित क्षेत्रीय भेटी वाढवून स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचारी आपल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 ची प्रक्रिया सुरू झाली असून यामधील एक महत्वाचा भाग असलेल्या ‘नागरिकांचा प्रतिसाद’ अर्थात ‘सिटीझन फिडबॅक’ नोंदविण्यास स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरूवात झाली आहे. याकरिता हीींंीि://ीलाीलरप.ेीस/षशशवलरलज्ञ या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर नागरिकांनी शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलवरून नवी मुंबई शहराच्या देशातील सर्वोत्तम मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणाऱ्या 10 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचवावे असे आवाहन करण्यात येत आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांचा वापर करून प्रतिसाद नोंदविण्यासाठी नागरिकांपर्यंत वेबसाईटची लिंक तसेच क्यू आर कोड पोहचविण्यात येत आहे. तरी प्रत्येक नवी मुंबई नागरिकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वत: 10 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत तसेच आपले कुटुंबिय, मित्र - परिवार, कार्यालयीन सहकारी यांनाही अभिप्राय नोंदविण्यास सांगावे व प्रोत्साहीत करावे असेही आवाहन करण्यात येत आहे.
त्यासोबतच नागरिकांमार्फत शहर स्वच्छतेवर लक्ष रहावे आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने प्रभावी ‘तक्रार निवारण प्रणाली’ कार्यान्वित केली असून ‘ ’ ॲपही तयार केले आहे. नागरिक या दोन्ही माध्यमांचा वापर करून स्वच्छतेविषयीच्या आपल्या तक्रारी सहजपणे नोंदवू शकतात व आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले ? याची माहितीही जाणून घेऊ शकतात.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुजाण नागरिकांनी कचरा वगकरण हा आपला प्राधान्यक्रम समजून त्यादृष्टीने अधिक सक्रिय होत कार्यवाही करावी तसेच घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांचा प्रतिसाद ( ) स्वत: तर नोंदवावाच व आपल्या संपर्कातील इतरांनाही अभिप्राय नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच शहर स्वच्छतेत आपले योगदान देत ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमचा प्रभावी वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai