पालिकेच्या सीबीएसई शाळांतील प्रवेश सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 417
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून या शाळातील प्रवेशासाठी पालक गद करत आहेत. सीवूड्स सेक्टर 50 येथील शाळा क्रमांक 93, कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 व सारसोळे येथील शाळा क्रमांक 98 येथील शाळांमध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते इयत्ता 8 वी च्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्याने प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पालकांची गद केली.
सीवूड्स, कोपरखैरणे आणि सारसोळे या तिन्ही ठिकाणच्या शाळांमध्ये एकूण 415 प्रवेश दिले जाणार आहेत. आवश्यक प्रवेशांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने अर्ज निवडण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. च्या आत अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयाची अट पूर्ण असणे आवश्यक आहे. गुरुवारपासून अर्ज स्वीकृती सुरु झाली. 12 मार्च 2025पर्यंत अर्जांची मुदत आहे. त्यामुळे अर्ज घेण्यासाठी पालिकेच्या तिन्ही सीबीएसई शाळेमध्ये पालकांनी गद केली होती.
प्रवेश मर्यादा
- नेरुळ शाळा क्रमांक 93 182
- सारसोळे शाळा क्रमांक 98 102
- कोपरखैरणे शाळा क्रमांक 94 131
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai