Breaking News
पनवेल : यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल 2024 ते 4 मार्च या दरम्यान पनवेल महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील चार दिवसात दररोज पालिकेच्या तिजोरीत 1 कोटीहून अधिक रकमेची भर पडत आहे. यामध्ये 1 ते चार मार्च या दरम्यान 5 कोटी 56 लाख रुपयांचा भरणा झाल्याचे समजते.
मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्रोत असून पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 31 मार्च ही मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख आहे. मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दर महिन्याला 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने करदाते मालमत्ता कर भरत आहेत. मागील चार दिवसात दररोज पालिकेच्या तिजोरीत 1 कोटीहून अधिक रकमेची भर पडत आहे. यामध्ये 1 ते चार मार्च या दरम्यान 5 कोटी 56 लाख रुपयांचा भरणा झाला आहे.
मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या मझचउ ढअद अझझफ मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येईल. या ॲपमध्ये नाव बदलाकरीता विनंती केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांस नोटिफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने मोबाईल ॲप वकसित केले आहे. तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊनही करदाते त्यांचा कर भरु शकतील असे पालिकेने प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे. अधिक माहितीसाठी 1800 5320340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता अटकावणी मोहिमेला जोमाने सुरुवात केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून गेल्या 3 दिवसामध्ये 12 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन-कर आकारणी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विविध जप्ती आणि अटकावणी पथकाच्या माध्यमातून वेगाने कारवाई केली जात आहे.
जानेवारी महिन्यात महापालिकेने 27 मालमत्तांवर तर फेब्रुवारी महिन्यात 21 मालमत्तांवर अटकावणी कारवाई केली. परंतु, अटकावणी केलेल्या मालमत्ताधारकांनी आपला अधिकांश मालमत्ता कर भरल्याने यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai