पनवेलमध्ये आठवड्यातील एक दिवस पाणीकपात
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 263
पनवेल : मार्च-एप्रिल महिना सुरु झाला वाढणाऱ्या उन्हासोबत पाणीटंचाईही वाढत जाते. त्यामुळे अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या योग्य पाणी नियोजनासाठी सालाबादाप्रमाणे यंदाही पनवलेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणारा आहे. आठवड्यातील एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने मंगळवारी याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करुन कोणत्या जलकुंभावरील पाणी ग्राहकांना आठवड्यातील कोणत्या दिवशी पाणी मिळणार नाही याची सूचना प्रसिद्ध केली आहे.
पनवेल शहरातील रहिवाशांना 32 दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. देहरंग येथील अप्पासाहेब वेदक धरणातील शिल्लक पाण्याचा साठा संपूर्ण उपसा केला तर मे महिन्यापर्यंत जलाशयातील सर्व पाणी संपून जाईल. यासाठी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या संस्थांकडून पाताळगंगा नदीतील उसनवारीने पाणी घेऊन पनवेल शहरातील नागरिकांना पुरवठा केला जातो. रविवार आणि सोमवार पाताळगंगा नदीतून मिळणारा पाणी पुरवठा कमी होतो. तसेच इतरवेळी तांत्रिक दुरुस्तीच्या कारणामुळे पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने देहरंग धरण आणि पाताळगंगा नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील 9 वेगवेगळ्या जलकुंभनिहाय पाणीपुरवठा केला जात असल्याचे पनवेल पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मागील वष 29 डिसेंबरला पाण्याचे नियोजन करावे लागले होते. यंदा मार्चपासून पालिकेला नियोजन करावे लागले आहे.
- अमृत योजनेचे काम संथगतीने
पनवेलकरांना सध्या एमजेपीकडून 15 एमएलडी पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी मागील वष मार्च महिन्यात शासनाने अमृत योजनेतून 10 एमएलडी वाढीव पाणी पुरवठा पनवेलसाठी मंजूर केला. परंतु एमजेपीची योजना अजूनही कार्यान्वित न झाल्याने या वाढीव पाणीपुरवठा करुनही त्याचा लाभ पनवेलकरांना मिळू शकला नाही. अमृत योजनेचे काम संथगतीने होत असल्याचा मोठा फटका रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai