164 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 276
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील 164 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत समावेश करण्यासंदर्भातील सिडकोच्या अहवालानुसार 164 अर्जदारांची नावे सिडकोच्या आस्थापनेवर आढळून आलेली नाहीत, महानगरपालिकेने त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची शहानिशा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून महापालिकेने या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांची मूळ वंशावळ आणि इतर आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांच्या प्रकल्पग्रस्ततेची पडताळणी करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. चर्चेत विधानसभा सदस्य गणेश नाईक यांनी सहभाग घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai