भटके श्वान, मांजरींचे पालिकेने केले सर्वेक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 137
19 हजार श्वान, 5 हजार मांजरी; पशूंसाठी दोन फिरते दवाखाने
पनवेल ः महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) माध्यमातून साडेचार महिन्यांत भटके श्वान आणि मांजरींचे सर्वेक्षण पूर्ण केले. नुकताच यासंदर्भातील अहवाल पालिका आयुक्तांना पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर केला. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कुत्रा व मांजरांच्या प्रभावी लसीकरण व निबजीकरणासाठी पालिका आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. एप्रिल महिन्यापासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने पालिका सुरू करणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
रेबीज निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला. 19 लाख रुपये खर्च करून पालिकेने श्वानांचे रेबीज निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम योजनेअंतर्गत झायमॅक्स टेक सोल्युशन या कंपनीला इंडिया केअर तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. कंपनीने सर्वेक्षणासाठी प्राणीशास्त्र विषयातील 20 पदवीधर तरुणांना यासाठी नेमले. पनवेल पालिका क्षेत्रातील 20 वेगवेगळ्या प्रभागांचे 195 परिभाग करून हे सर्वेक्षण करण्यात आले. एकाच रस्त्यावर किंवा एक गल्ली किंवा एका सोसायटीत वेगवेगळे तीन दिवस एकाच वेळी जाऊन हे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षण अहवालामध्ये पालिका क्षेत्रात सुमारे 19 हजार भटके श्वान आणि 5 हजारांहून अधिक मांजरी असल्याचे वर्तविण्यात आले आहेत. सुमारे 9 हजार पाळीव श्वान पनवेलमध्ये असल्याचे नमुद करण्यात आले आहेत. पनवेलमध्ये भटक्यांसह पाळीव कुत्रे आणि मांजरांसाठी दोन फिरते दवाखाने पालिका सुरू करणार आहे. दोन फिरत्या रुग्णवाहिकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, मदतनीस आणि त्यांच्यासह औषधांचा साठा, उपचारासाठीचे साहित्य अशा सर्व सुविधांनी हा दवाखाना परिपूर्ण असेल. झायमॅक्स टेक सोल्युशन या कंपनीला हे काम देण्यात आले.
सध्या पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी बी.एन.गीते, डॉ. मधुलिका लाड, दत्ता मासाळ यांच्या देखरेखीखाली हे नियोजन सुरू आहे. निबजीकरण आणि लसीकरण वेळीच झाल्यास भविष्यातील भटके कुत्र्यांपासून उपद्रव नियंत्रणात आणता येईल असे पालिकेचे नियोजन आहे. पालिकेच्यावतीने मागील सात वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. या अहवालामुळे पालिका क्षेत्रातील 40 टक्के निर्बिजीकरण झाल्याचे समजल्याने उर्वरीत 60 टक्के कुत्र्यांकडे पालिकेने लक्ष्य केंद्रीत केले आहे.
- कुत्र्यांना ओळख क्रमांक
सर्वेक्षणामुळे पालिकेकडे 13,601 कुत्र्यांची छायाचित्र चार वेगवेगळ्या पद्धतीने मिळाली आहे. या सर्वेक्षणामुळे कुत्र्यांना त्यांच्या ओळखीसाठी ओळख क्रमांक पालिकेकडून मिळाला आहे. त्या कुत्र्यांचे सध्याचे वय आणि त्याच्या प्रकृतीची माहिती, अंगावरील जन्माची व्रण असे सर्व माहितीसह संकलित केली आहे. लसीकरणासाठी तो श्वान कुठे सापडेल त्याचा रहदारीचा पत्ता व लोकेशन पालिकेकडे दिलेल्या अहवालात दर्शविण्यात आला आहे. एका फोटोच्या क्लिकवर संबंधित श्वानाची माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे मिळू शकेल. या सर्वेक्षणानूसार पनवेल पालिका क्षेत्रात 50 टक्के नर कुत्रे, 36 टक्के मादी कुत्रे आणि 14 टक्के न ओळख झालेल्या कुत्रे वावरत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai