पनवेलमध्ये मलाबारचे नवीन दालन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 321
पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिकतेचा साज
पनवेल : विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पनवेल येथील एमसीसीएच सोसायटीमध्ये त्यांच्या नवीन शोरूमचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. 3,146 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलींमध्ये दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे. पारंपरिक दागिन्यांपासून आधुनिकतेचा साजशृंगार उपलब्ध आहे.
हे शोरूम ब्रँडचे भारताच्या पश्चिम विभागातील 43 वे विक्री दालन आहे. नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्यवस्थापन पथकाचे सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कारागिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवण्याच्या मलाबार ब्रॅण्डच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे. नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाइन केलेले सोने, हिरे, प्लॅटिनम, रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. भारतातील पारंपारिक डिझाइनपासून ते आधुनिक साजशृंगारासाठी समकालीन शैलींपर्यंत विविध दागिने येथे उपलब्ध आहेत.
भारत, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह 13 देशांमध्ये 390 हून अधिक शोरूम्ससह, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे. मार्चमध्ये संपूर्ण भारतात 12 नवीन शोरूम उघडण्यात आले आहेत. 26 देशांमधील 22,000 बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित संघाच्या पाठिंब्याने, ब्रँडने जगभरातील 1.5 कोटींहून अधिक समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधून दिलेल्या निवेदनात, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, पनवेल येथे आमचे शोरूम उघडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये, आम्ही सुंदरतेचा अपवादात्मक कारागिरीशी मिलाफ साधणारे दागिने देण्यासाठी समर्पित आहोत. गुणवत्ता, सचोटी आणि ग्राहकांच्या समाधानावर भर देऊन, आम्ही आमच्या दागिन्यांचे सर्वोत्तम संग्रहण पनवेलमध्ये आणण्यास आणि येथील उत्साही समुदायाला एक अविस्मरणीय खरेदी अनुभव प्रदान करण्यास उत्सुक आहोत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai