Breaking News
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या हस्ते
मुंबई : मनी लाँड्रींग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) या कायद्यविषयीच्या ट्रिटाईज ऑन पीएमएलए - लॉ ऍण्ड प्रॅक्टीस (दुसरी आवृत्ती) या ऍड. अखिलेश दुबे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन रविवार, ६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उज्जल भुयान यांच्या हस्ते होणार आहे. भारत लॉ हाऊस प्रायव्हेट लिमिटेडद्वारा प्रकाशित होणाऱया या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा साउथ लाउंज, तळ मजला, सेंटर-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आलोक आराधे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ व केंद्र सरकारचे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकामुळे भारतातील मनी लाँड्रींग कायद्याच्या अभ्यासात मोलाची भर पडणार असल्याचे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.
पीएमएलए कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ऍड. अखिलेश एस. दुबे यांनी आपल्या पुस्तकात पीएमएलए कायद्याच्या विविध पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे. कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिक, धोरणकर्ते आणि अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक सैद्धांतिक विचार आणि प्रत्यक्ष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai