Breaking News
25 हजारांहून अधिक जणांची ऑनलाइन नोंदणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील 620 रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्चपासून सुरू झाली असून 8 दिवसांतच 25 हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन नोंदणी केली. 11 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 2008 सालानंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भरतीमध्ये विविध 30 प्रकारच्या 620 कायम जागांसाठी ही भरती होणार आहे. नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या भरतीबाबतची सर्व माहिती नवी मुंबई महापालिकेच्या थथथ.पााल.से.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या भरतीमध्ये लिपिक टंकलेखक, लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स,कनिष्ठ अभियंता,आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत. तसेच बायोमेडिकल इंजिनीअर, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी,वैदकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट,डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ, सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध 30 प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पालिकेने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच विविध पदे व त्यांची संख्या यांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai