‘पनवेल कनेक्ट’ ॲपचे लोकार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2025
- 240
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल 63 ऑनलाइन विविध सेवा घरबसल्या मिळणार आहेत. या ॲपचे लोकार्पण रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दि. बा. पाटील विद्यालयात करण्यात आले.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या ॲपमुळे नागरिकांना पालिका सेवेची हमी मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक पालिकेच्या विविध सेवा, तक्रारी, कर भरणा, सरकारी योजना, स्थानिक बातम्या व नागरी समस्या याबाबत माहिती व सुविधा मिळवू शकतात. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी ॲपमध्ये 24 तास आपत्ती व्यवस्थापन केंद्र उपलब्ध असणार आहे. पोलिस, अग्निशमन व रुग्णवाहिका यांसारख्या सेवाही या ॲपमधून मिळू शकतील.
शहरातील मुख्य चौकांमध्ये डिजिटल फलकांची स्थापना करण्यात आली असून, यावरून सरकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. या उपक्रमांमुळे महापालिका आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होणार असून, ‘पनवेल कनेक्ट’ ॲप ही डिजिटल युगातील एक महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे पालिका आय़ुक्त चितळे यांनी सांगितले. शहरातील सर्व खाजगी कंपनींची नोंद घेऊन गरजू युवा व नागरिकांसाठी या ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात अनेक रोजगार निर्मिती संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या सोशल मीडिया, पत्र, ईमेल अश्या विविध माध्यमा द्वारे येणाऱ्या समस्या व प्रश्न यासाठी या ॲप मार्फत तक्रार निवारण प्रणालीचा वापर करून सोडवल्या जाणार आहेत. यामध्ये किती तक्रारी आल्या व त्यावर कोणती कार्यवाही केली आणि किती प्रलंबित आहेत, या सर्व तक्रारी संबंधित अहवाल व डॅशबोर्ड आयुक्त यांच्या देखरेखेखाली असणार आहे.
पनवेल कनेक्ट ॲपचा वापर करून माहिती संकलन करणे, महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क कायदा-2015 अंतर्गत ऑनलाइन सेवांचा अर्ज करणे, महानगरपालिका कर्मचारी यांच्यासाठी विविध सुविधा, तसेच चालू घडामोडींवर वेबिनार, ब्लॉग्स उपलब्ध होणार आहेतच पण यासोबतच चॅटबोटचा वापर करून सदर ॲपद्वारे नागरिकांना 24/7 सहाय्य उपलब्ध असणार आहे. यासाठी महापालिकेने 8960916091 या मोबाईल क्रमांक जाहिर केला आहे. ज्यामुळे नागरिकांचे प्रश्न आणि सेवा, विनंती यांचे त्वरित समाधान होण्यास मदत होणार आहे. सदर ॲपद्वारे जीपीएसच्या माध्यमातून स्थानिक नागरिक तसेच पर्यटक व स्थलांतरित रहिवाशांसाठी पनवेल महानगर पालिका हद्दीतील जवळची सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच रक्तपेढ्या, उद्याने सुलभतेने शोधता येणार आहेत.
- रोजगार मेळावा
या कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 40 कंपन्यांनी सहभाग घेतला. एकूण 3,500 उमेदवारांनी नावनोंदणी केली होती. यातील 1,736 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून 872 उमेदवारांची निवड करण्यात आली, तर 213 उमेदवारांना त्वरित नियुक्तीपत्रे देण्यात आली. तांत्रिक प्रशिक्षणासाठी 614 उमेदवारांची निवड झाली, ज्यात दोन अपंग उमेदवारांचाही समावेश होता. मेळाव्यात नियुक्तीपत्र दिलेल्या एका उमेदवाराला सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष 2.4 लाख रुपयांचे कंपनीने दिले.
पनवेल कनेक्ट ॲपवरील महत्वाच्या सुविधाः
- महिलांची सुरक्षाः सुविधा व निर्भया कक्षाशी थेट संपर्क
- महिला सक्षमीकरणः राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती व उपलब्धता
- रोजगार संधीः खाजगी कंपन्यांची माहिती व रोजगार उपलब्धतेसाठी प्लॅटफॉर्म
- तक्रार निवारण: तक्रारी नोंदवणे, त्यावरची कारवाई व अहवालांचे डॅशबोर्डवर परीक्षण
- संपूर्ण माहितीचा ॲक्सेस: द्वारे जवळची शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, स्वच्छतागृहे व रक्तपेढ्या
- 6.247 सहाय्य: चॅटबोटच्या माध्यमातून त्वरित सेवा व मार्गदर्शन
- 7. महत्वाच्या घडामोडी: वेबिनार, ब्लॉग्स, व शासकीय घडामोडींची नियमित माहिती
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai