सर्वोच्च न्यायालयाने मालमत्ता कर याचिका फेटाळली
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2025
- 237
दीपक फर्टिलायझस कंपनीला दिलासा नाही
पनवेल ः पनवेल महानगरपालिकेने तळोजा एमआयडीसी युनिटसाठी जारी केलेल्या मालमत्ता कर सूचनेला आव्हान देणारी दीपक फर्टिलायझर्सने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. कोणत्याही शिथीलतेसाठी उच्च न्यायालायातत अर्ज करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय महापालिकेसाठी एक महत्त्वपूर्ण विजय आहे आणि या प्रदेशातील औद्योगिक युनिट्सकडून पुढील कर वसुलीचा मार्ग मोकळा झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पनवेल महापालिकेचा थकीत कर भरण्यावरुन तळोजा एमआयडीसी दीपक फर्टिलायझर्स कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र अगोदर थकीत मालमत्ता कर न्यायालयातकजमा करा त्यानंतर प्रकरण ऐकुन घेऊन असे निर्देश दिल्यामुळे या निर्णयाविरोधात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झआली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमुत बी.व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या पूवच्या निर्णयाला कायम ठेवत दीपक फर्टिलायझर्सला कोणताही दिलासा देण्यास किंवा स्थगिती देण्यास नकार दिला आणि कंपनीला या प्रकरणात काही सवलत हवी असल्यास उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. दीपक फर्टिलायझर्सचे प्रतिनिधित्व वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले, तर पीएमसीच्या कायदेशीर पथकात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वरिष्ठ वकील पटवालिया, सुधांशू चौधरी आणि सम्राट शिंदे यांचा समावेश होता. पीएमसी आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि उपायुक्त स्वरूप खरगे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. यावेळी त्यांनी उपस्थित राहून महापालिकेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या काळातील कागदपत्रांसह सर्व संबंधित रेकॉर्ड सध्याच्या नगरपालिका प्रशासनाला सादर केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम्ही आता मालमत्ता कर वसूल करण्यात अधिक सुरळीतपणे पुढे जाऊ शकतो, असे पालिकने अधोरेखित केले आहे. तसेच या निर्णयामुळे आता कर थकविणाऱ्यांना न्यायालयाकडून दाद मागण्यासाठी आधी न्यायालयात थकीत कराची रक्कम भरावी लागणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai