दहशतवादी हल्ल्यात पनवेलचे दिलीप देसले मृत्यूमुखी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 406
पनवेल : जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनीत राहणाऱ्या दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे. तर सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोन जण जखमी आहेत.
निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यापैकी या तिघांचा समावेश आहे. श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. उर्वरित पर्यटक सुखरूप असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे. पनवेल मधील निसर्ग ट्रॅव्हलचे मालक ओक यांच्या कडून देखील पनवेल शहर पोलिसांनी खात्री केली आहे. दरम्यान निसर्ग ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याबाहेर गद केली होती. आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही अशी चिंता सर्व नातेवाईकांना सतावत होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील पोलिस ठाण्यात धाव घेत जखमी व मृत पावलेल्या पर्यटकांची माहिती घेतली.
नवीन पनवेल मध्ये देसले यांच्यासह योगा ग्रुपच्या माध्यमातुन काही स्थानिक रहिवासी नियमित योगा करतात. या घटनेबाबत बुधवारी पहाटे या योगा ग्रुपच्या सदस्यांना माहिती पडल्यावर त्यांनी योगा न करता दिलीप देसले यांना श्रद्धांजली वाहत या घटनेचा निषेध केला. दिलीप देसले हे तुर्भे एमआयडीसी मधील लुब्रीझॉल कंपनी मधील निवृत्त वर्कर आहेत. त्यांना तीन मुले आहेत. तिघांपैकी एक मुलगा आणि मुलगी पुण्याला स्थायिक झाले आहेत तर एक मुलगी नवीन पनवेल मध्ये वास्तव्यास आहेत. अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे असलेले दिलीप देसले (67) हे मागील चार वर्षापासून सतत येथील योगा ग्रुप सोबत जोडलेले असल्याची माहिती बळीराम देशमुख यांनी दिली. आपल्यापैकी एका सदस्यांचा अशा दुर्दैवी घटनेत अंत होतो यामुळे अनेकजणांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच शेजारी तसेच देसलेंच्या नातेवाईकांनी त्यांची घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात बुधवारी (23 एप्रिल) संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा सूड घ्या, अशी संतप्त प्रतिक्रिया देसले कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मंत्री दत्ता भुसे आणि माजी आमदार बाळाराम पाटील आवर्जून उपस्थित होते. निसर्ग पर्यटनसोबत गेलेले सुबोध पाटील (कामोठे) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी माणिक पाटील सुरक्षित आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai