Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई बालरंगभूमी आणि संत शिरोमणी कला मंच नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 2 मे ते 12 मे 2025 या कालावधीमध्ये बालनाट शिबिराचे आयोजन वाशीतील विष्णुदास भावे नाटगृहातील तालीम हॉल येथे दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे.
नवकलाकारांच्या सुफ्त कला गुणांना योग्य संधी मिळावी आणि त्यातून चांगले कलाकार घडावे, चांगले नाट्यरसिक घडावे या उद्देशाने गेले 28 वर्षे ज्येष्ठ रंगकम श्रीहरी पवळे शिबिराचे आयोजन करीत आहे. या शिबिरामध्ये बालनाट्य संकल्पना, बाल नाट्य अभिनयाची ओळख, अभिनयाचे प्रकार, समाधीठपणा, निरीक्षण व कल्पनाशक्तीचा विकास सूत्रसंचालन, निवेदन, संवाद फेक नृत्य संस्कार अशा विविध विषयावर प्रात्यक्षिक होणार आहे आणि अखेरच्या दिवशी बालनाट्य सादरीकरण होणार आहे.
या शिबिरासाठी श्रीहरी पवळे मार्गदर्शन करणार आहेत. जे विद्याथ मागील शिबिरात सहभागी झाले होते त्यांना सदर शिबिर विनामूल्य असणार आहे. या शिबिरामध्ये सहा वर्षापुढील बालकलाकारांना प्रवेश दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये मर्यादित जागा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी श्रीहरी पवळे 9322504314 संपर्क साधावा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai