घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले 4 मृतदेह

चौघेही एकाच कुटुंबातील  ः आत्महत्या केल्याचा अंदाज

नवी मुंबई : तळोजा सेक्टर 9 येथील एका सोसायटीमधील घरामध्ये चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि त्यांच्या पालकांचा समावेश आहे. चारही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. 

तळोजा सेक्टर 9 मधील शिव कॉर्नरवरील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. नितेश कुमार उपाध्याय हे स्वत:, पत्नी, मुलगी, मुलगा यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असून चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून चौघांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोसायटीत दुर्गंधी न पसरल्याने ही घटना समजली नसल्याचे सोसायटीतील नागरिकांनी सांगितले आहे.