Breaking News
6 जून रोजी शासनातर्फे बैठकीचे आयोजन
उरण ः कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने मुख्य संघटक संतोष पवार यांनी दि. 26 मे 2025 रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेत शासनाने 6 जून रोजी बैठकीचे आश्वासन दिल्याने कामगार नेते संतोष पवार यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. 20 मार्च 2020 रोजी राज्याचे मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, वीत्त विभाग सचिव ओमप्रकाश गुप्ता, नगरविकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे आणि नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकण यांच्या उपस्थितीत जे निर्णय 2 वर्षांपूव घेण्यात आले होते त्याची अंमलबजावणी तसेच काही ईतर प्रस्ताव जे मनोज रानडे, आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून, वेळोवेळी प्रस्तावित केलेली प्रकरणे मंजूर करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने लेखी, तोंडी सर्व पद्धतीने आणि याबाबत कामगार नेते संतोष पवार यांनी प्रत्यक्षात पाठपुरावा करूनही राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती मधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांचे प्रश्न प्रदिर्घ काळापासून नगरविकास विभाग मंत्रालय येथे प्रलंबित होते. राज्यातील हजारो कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रदिर्घ काळापासून प्रलंबित होते या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदने, धरणे, मोर्चे, कामबंद आंदोलने अशी विविध आंदोलने झाली परंतू प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे हजारो कामगारांचे न भरून निघणारे नुकसान होत होते. त्यामुळे कामगार नेते संतोष पवार यांनी 26 मे 2025 रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते. 6 जून रोजी कामगार नेते संतोष पवार यांना शासनाने बैठकीचे आश्वासन दिल्याने त्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
हे उपोषण यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते अनिल दादा जाधव यांनी अतीशय मेहनत घेतली. डॉ डि एल कराड, ॲड सुरेश ठाकूर, रामेश्वर वाघमारे, ॲड सुनील वाळूंजकर, अनिल पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण निश्चित करण्यात आले. प्रा. राजेंद्र मढवी, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, कार्याध्यक्ष मधूकर भोईर आणि हर्षवर्धन पवार यांनी ही प्रयत्न केले. सदर आमरण उपोषण हे तात्पुरते स्थगित करण्यात आले असून 6 जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहुन पुढील दिशा, भूमिका ठरविण्यात येईल असे कामगार नेते संतोष पवार यांनी सांगितले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai