Breaking News
लक्झरी स्पोर्ट्स थीम वर आधारीत निवासी घरे
नवी मुंबई ः नवी मुंबई : हिरानंदानी कम्युनिटीज या निरंजन हिरानंदानी उपक्रमातर्फे नवीन लक्झरी निवासी क्षेत्र असलेल्या ‘दि अरेना’ ची सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली. दि अरेना ही योजना स्पोट लाईफस्टाईल या थीमवर आधारीत असून ती हिरानंदानी फॉर्च्युन सिटी येथे 10 एकरांवर पसरलेला हा प्रकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पामध्ये आठ आकर्षक टावर्स मध्ये 2, 3 आणि 4 बीएचकेच्या सदनिका असतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ग्रीनफील्ड, आर्केडिया आणि सिटॅडेल असे तीन टावर्स असून यांत 600 हून अधिक घरे आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला रेराची मान्यता मिळाली असून यामध्ये तीन टावर्सचा समावेश आहे, या प्रकल्पाकडून 1100 कोटी रुपयांच्या महसूलाची निर्मिती होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बदलात्मक अशा गुंतवणूकीच्या आकडेवारीनुसार यामुळे मोठे आर्थिक मुल्य निर्माण होण्याची शक्यता आहे. अरेनामध्ये 80 हून अधिक लाईफस्टाईल थीम्ड सुविधा असून यांत 10 हून अधिक कोर्ट वर आधारीत सुविधा, आरामदायक इनडोअर उपाय आणि योग्य पध्दतीने तयार करण्यात आलेल्या वेलनेस आणि लीझर स्पेसेसचे डिझाईन हे विविध पिढ्यांतील नागरिकांसाठी करण्यात आले आहे. अचूकपणे संकल्पनेने युक्त अरेना मध्ये सर्वसमावेशक राहणीमानासह नागरिकांना त्यांचे स्वत:चे खेळाचे मैदान आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
अरेना मध्ये प्रथमच घर खरेदी करु इच्छिणाऱ्या मिलेनियल्स सह राहण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी असून यामध्ये ॲक्टिव्ह आणि आरामदायक राहणीमानाची अपेक्षा ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य आहे. या स्पोट ॲक्टिव्हिटी वर आधारीत घरांमध्ये लोकसंख्यात्मक आकर्षण असून यामध्ये स्थानिक खरेदीदार, स्थानिक गुंवणूकदार आणि एनआरआय जनता यांचा समतोल असून मुंबई 3.0 आता आर्थिक वाढीचे केंद्र बनत आहे. त्याचबरोबर यामध्ये प्रतिथयश असे हिरानंदानी घर खरेदी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही आकर्षक निवासस्थाने अतिशय स्पर्धात्मक अशा किंमतीत आहेत. 2 बीएचकेचे घर हे 1.31 कोटींपासून सुरु आणि 3 व 4 बीएचके घरे हे 1.77 कोटींपासून पुढच्या दरात उपलब्ध आहे. कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते अरेना हे केवळ एक निवासी संकूल नाही तर हे लक्झरी मधील आकर्षक जीवनशैलीसाठी योग्य असणार आहे. प्रेस्टिजसह आकर्षक डिझाईन करण्यात आले असून यामध्ये रोजच्या जीवनशैलीचा समतोल राखला आहे. आकर्षक अशा हिरानंदानी परंपरेशी जोडले जाऊन सर्वोत्कृष्टता आणि वेगळेपणाचा अनुभव येथे घेता येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai