Breaking News
नवी मुंबई ः नैना क्षेत्रात सद्यस्थितीत एकूण 12 नगररचना परियोजना राबविण्यात येत असून, यातील परियोजना क्र. 8, 9, 10, 11 आणि 12 या योजनांसाठी लवादांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. या सुनावणीला 30 जून 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
परियोजना क्र. 8, 9, 10, 11 आणि 12 या योजनांसाठी लवादांची सुनावणी सुरु आहे. काही जमीनधारक विविध कारणांमुळे याआधीच्या सुनावणीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना संधी मिळावी म्हणून सिडकोने यापूव 30 मे 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीनुसार व हितधारकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सिडको आता ही सुनावणी अंतिमतः 30 जून 2025 पर्यंत वाढवत आहे. ही अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित भूधारक, नागरिक आणि हितधारकांनी या संधीचा लाभ घेत आपले म्हणणे मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, जेणेकरून या महत्वपूर्ण प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग आणि हितसंपादन होऊ शकेल.सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत-सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान-सिडको नैना कार्यालय, टॉवर क्रमांक 10, 7 वा मजला, सीबीडी रेल्वे स्थानक संकुल येथे संपर्क साधावा असे आवाहन सिडकोने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai