मद्यविक्रिला परवानगी दिल्याने खारघरवासियांत नाराजी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2025
- 213
दारुमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकवटले ; वाईन शॉप विरोधात आंदोलन
पनवेल : खारघर उपनगरामध्ये 2004 ते 2006 या काळात ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय घेतला. मात्र ऑक्टोबर 2016 साली पनवेल महापालिकेच्या स्थापनेमध्ये खारघर उपनगराचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्य विक्री केंद्र, रेस्तराँ आणि बारच्या परवानग्या मागणाऱ्यांची गद वाढली. सध्या खारघर परिसरात 4 बार व रेस्तराँ आणि 1 मद्य विक्रीच्या दुकानाला परवानगी देण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सर्वाधिक शाळा, महाविद्यालये, तंत्रशिक्षण महाविद्यालय खारघरमध्ये असल्याने या शहराची ओळख शैक्षणिक शहर म्हणून होत आहे. भविष्यातील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कसारखे वाणिज्य वसाहत येथे होत असल्याने मद्य विक्री केंद्र, रेस्तराँ आणि बार सुरू होण्यास येथे पोषक वातावरण सरकारकडून निर्माण केले जात आहे. रायगड जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाने खारघरमध्ये नुकतेच गोल्ड कॉइन मार्ट वाइन या दुकानाला परवानगी देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र ही परवानगी देताना सर्व काही कायदेशीर प्रक्रिया पार केल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. त्यामुळे नागरिकांच्यावतीने या विरोधात संघर्ष करणाऱ्या सामाजिक संस्था, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हा कायदा नागरिकांच्या रक्षणासाठी आहे का? असा प्रश्न समाजमाध्यमांवर सरकारला विचारला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून खारघरचे नागरिक विविध मार्गाने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधत आहेत.पनवेल महापालिकेने यापूव पनवेलसाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला. मात्र अशी सरसकट संपूर्ण महापालिका क्षेत्रात मद्यबंदी करता येत नसल्याची सबब राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यावेळेस स्पष्टीकरणात दिली होती. मद्य विक्रीचे दुकान सुरू होऊन काही दिवस उलटल्यामुळे मद्य पिणाऱ्यांना बाटल्या खऱेदीसाठी बेलापूर व तळोजा येथे जाणाऱ्या मद्यपींना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दारुमुक्तीसाठी सर्वपक्षीय नेते एकवटल्याचे पाहायला मिळाले.
- अतिक्रमणांवर कारवाई
संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी वाईन शॉप विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यामध्ये आ. प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, मनसेचे केसरीनाथ पाटील, कॉलनी फोरमच्या लीना गरड यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पालिकेच्या वतीने खारघर सेक्टर 6 येथील शहा आर्केड सोसायटीच्या गाळ्यात सुरु असलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट आणि जे.जे. एस. रसोई फमिली रेस्टॉरंट अँड बार यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai