आदिवासी वाड्यांवर शैक्षणिक साहित्य वाटप फो
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2025
- 184
उरण ः वनवासी कल्याण आश्रम उरणच्या वतीने अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर ,केल्याचा माळ वाडी,विंधणे वाडी येथील शाळेत जाणाऱ्या मुलांना वह्या, शालोपयोगी वस्तू वाटप, खाऊवाटप तसेच विंधणे येथे (फॉन ) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था,चिरनेर, उरण यांस प्राण्यांसाठी फर्स्ट ऐड किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे सह सचिव कुणाल शिसोदिया यांनी प्रस्तावना करून संस्थेची माहिती उपस्थिताना सांगितली. अक्कादेवी वाडी येथे 20, केळ्याचा माळ वाडीवर 30, विंधणेवाडीवर 55 मुलांमुलींना वह्या तसेच शालोपयोगी वस्तू, खाऊ वाटप करण्यात आला. वनवासी कल्याण आश्रम उरणचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण आल्यास तेथील कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांस सांगावे, त्यांच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत वनवासी कल्याण आश्रम आपणास करेल अशी ग्वाही दिली. वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) निसर्ग सर्प संवर्धन संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांच्याकडे पक्षी व प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रथम उपचार किट देण्यात आले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विषारी बिनविषारी सर्प कसे ओळखायचे ते सांगितले. तसेच कोणास सर्पदंश झाल्यास इतर गावठी इलाज न करता ताबडतोब रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.तसेच साप व इतर वन्यजीव हे निसर्गचक्राचे घटक असून कुठेही वन्यजीव धोक्यात असल्यास त्यास न मारता फॉन या सर्पमित्र संस्थेच्या हेल्पलाइन वर संपर्क करावा असे सांगितले.
फॉन संस्थेचे निकेतन रमेश ठाकूर यांनी चिरनेर परिसरात येणाऱ्या जंगलामध्ये येणाऱ्या प्राणी, पक्षी, कीटक संशोधकांस तेथील स्थानिक नागरिकांनी मार्गदर्शक म्हणून काम केले तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगून ते कसे मिळवायचे त्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास पाड्यांवरील जनजाती बांधवांसाठी काम करत असलेल्या जाणीव सामाजिक संस्था उलवाचे अध्यक्ष सुनील ठाकूर आवर्जून उपस्थित होते. वनवासी कल्याण आश्रमचे कुलाबा जिल्हा उपाध्यक्ष उदयजी टिळक, प्रांत महिला सहप्रमुख सुनंदा कातकरी, जिल्हा शिक्षण आयाम सहप्रमुख मीरा पाटील, ालसंस्कार वर्ग, दीपक गोरे, वामन म्हात्रे, वर्षा अधिकारी, साधना पागी, बेबीताई कातकरी, मित मेडिकल विंधणेचे मालक बळीराम पेणकर उपस्थित होते. या कार्यकमासाठी बिना इन्व्हेस्टमेंट उरण चे विपुल सरवैय्या, कमलेश प्रजापती तसेच जितेंद्र परमार, प्रशांत ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
- आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण ः श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने उरण तालुक्यातील आदिवासी कातकरी पिरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.तसेच महिला व लहान मुलांचे चेकअप देखील करण्यात आले व मोफत औषधे वाटण्यात आली. 38 जणांनी वैद्यकीय तपासणी चा लाभ घेतला.शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर,समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था कार्याध्यक्ष संगीता ढेरे( रायगड भूषण ) कविता म्हात्रे ,पूजा प्रसादे, मीना रावल, विशाखा म्हात्रे,अनघा ठाकूर, रश्मी तांबे, सीमा निकम, सुमन ताई तोगरे, तृप्ती भोईर, श्रेया ठाकूर, योगेश म्हात्रे, उमेश वैवडे , सचिन ढेरे,केशव निकम, दिनेश हळदणकर,अमर ठाकूर, आनंद ठक्कर ,घनश्याम भोईर, सुभाष पाटील, संग्रामकाका तोगरे, दीपक प्रसादे या सर्वांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असून या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai