Breaking News
चार टप्प्यात राबवणार अभय योजना
पनवेल ः पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती तातडीने अभय योजना लागू करुन रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील पदाधिकारी व माजी नगरसेवक गुरुवारी आक्रमक झाले. महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.
आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करुन जोपर्यंत शास्ती माफीची योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतल्यामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते. काही वेळाने यामध्ये भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतल्यावर शास्ती माफीची योजना लागू करु अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. भाजपच्या आंदोलनाला आलेल्या तातडीच्या यशानंतर आयुक्तांनी (पान 7 वर)
पत्रकार परिषद घेऊन चार टप्यात होणाऱ्या शास्ती माफीच्या अभय योजनेची माहिती दिली. यामध्ये पहिल्या महिन्यात थकीत कर भरणाऱ्यांना 90 टक्के अशी सर्वाधिक शास्ती माफी मिळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील दोन महिन्यांत चार वेगवेगळ्या टप्यात ही शास्ती माफीची अभय योजना लागू केली जाणार आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मागील आठ वर्षांपासून पनवेल महापालिकेच्या थकीत 1200 कोटी मालमत्ता कर वसुलीचा प्रश्न माग लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. परंतू यामुळे 600 कोटी रुपयांच्या शास्तीच्या रकमेवर महापालिकेला पाणी सोडावे लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai