आरोग्यवर्धनासाठी शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनचा पुढाकार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2025
- 242
मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण
मुंबई ः सामुदायिक आरोग्यवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय शिबिर आणि औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम एल अँड टी हेल्थ केअर आणि ब्रह्माकुमारी ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने पार पडला. शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या भव्य शिबिराला परिसरातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हे शिबिर शाहाजी नगर, अजीज बाग, सिता इस्टेटसमोर, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांसाठी मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आल्या. गरजेनुसार औषधे त्वरित उपलब्ध करून देण्यात आली. अनुभवी डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी योग्य आहारपद्धती, लहान आजारांपासून बचाव, जीवनशैलीतील बदल याबद्दल माहिती दिली. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी तपासणी करून घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी जतीन पवार, रितेश पाठारे, फैझान खान, शबाना खान, रक्षित ताजणे आणि संपूर्ण स्वयंसेवक टीमने अथक परिश्रम घेतले. नागरिकांची नोंदणी, तपासणी व औषध वितरण यासाठी त्यांनी मनापासून मदत केली. शिबिरासाठी स्थानिक सामाजिक संस्थांचेही मोठे योगदान लाभले. पंचशील तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय पवार तसेच समता युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य पवार यांनी विशेष सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी केला. उपस्थित मान्यवरांनी समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
सामुदायिक आरोग्य उपक्रमांसाठी सर्व संस्था आणि संघटनांनी एकत्र यावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या संचालिका रजनी ताजणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पुढेही असे अनेक उपक्रम आम्ही घेऊन येणार आहोत. शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनने पुढील काळातही अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करत समाजहिताची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai