ब्रह्माकुमारीज् संस्थेद्वारा रक्तदान महा शिबिर संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 159
नवी मुंबई : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा, संस्थेच्या दिवंगत प्रशासिका राजयोगिनी प्रकाशमणि दादीजींच्या अठराव्या पुण्य स्मृति दिवसाच्या निमिताने वाशी सेवा केंद्रावर नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाशी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शीला दिदी, माजी खासदार संजीव नाईक, हृदयरोग तज्ञ डॉ. रतन राठोड, डॉ. प्रीती सिंघानिया व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी वन मंत्री गणेश नाईक यांनी ब्रम्हाकुमारीज् संस्थेद्वारा आयोजित विविध सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तर संस्थेच्या केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शीला दिदी यांनी यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करुन रक्तदानाचे महत्व विषद केले. याप्रसंगी गणेश नाईक यांच्या हस्ते रक्तदान करणाऱया नागरिकांना प्रशस्ती पत्रक बहाल करण्यात आले. नवी मुंबई महापालिका रुग्णालय रक्तपेढीच्या संचालिका डॉ. प्रीती संघानिया व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानून शीला दीदी यांनी डॉ. प्रीती यांचाही सन्मान केला.
या रक्तदान महाशिबिर याद्वारे संपूर्ण भारतातून एक लाखाहुन अधिक रक्त पिशव्या गोळ्या करण्याचा विश्वविक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारीज संस्थेने केला आहे. या रक्तदान महाशिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती वाशी सेवा केंद्राच्या संचालिका शीला दीदी यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai