पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 06, 2025
- 137
पनवेल : पालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली. काही प्रभागात किरकोळ बदल वगळता 2017 प्रमाणे प्रभाग रचना असून याबाबतच्या हरकती आणि सूचनानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे.
पनवेल महापालिकेची 2016 ला स्थापना झाली. पनवेल नगरपरिषदेचा पूर्वीचा भाग, सिडको वसाहती आणि 29 महसुली गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला. 110 किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या पनवेल पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 2017 ला झाली. त्यावेळी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्यात आली. समाविष्ट गाव आणि खारघर असे 1 ते 6 अशी प्रभागांची संख्या आहे. कळंबोली वसाहती 7, 8,9 आणि 10 असे वॉर्ड आहेत. क्रमांक 9 मध्ये आसूड गाव, वळवली, टेंभुर्डे, खिडुकपाडा या गावांचा समावेश करण्यात आला. 11 ते 13 क्रमांकाच्या प्रभागात विशेष करून कामोठेचा भाग येतो. त्याचबरोबर 14 मध्ये खांदागाव तसेच पनवेलच्या काही परिसराचा समावेश करण्यात आला आहे. 15 मध्ये संपूर्ण खांदा वसाहत असून 16, 17 वार्डमध्ये नवीन पनवेल समाविष्ट आहे. तसेच 18 आणि 19 या प्रभागात संपूर्ण पनवेल शहर सामावून घेण्यात आलेले आहेत. प्रभाग क्रमांक वीसमध्ये तक्का,पोदी आणि काळुंद्रे गाव येते. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते. आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai