आंदोलनानंतर स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 06, 2025
- 134
नवी मुंबई ः मुंबई मध्ये सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मोठया संख्येने नवी मुंबईमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर व इतर ठिकाणी थांबलेले होते. 2 सप्टेंबर रोजी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर हे नागरिक आपापल्या गावांकडे परतले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर रात्रीपासून पहाटे 4 वाजेपर्यंत या भागात स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात आला. या मोहीमेत 21 टन कचरा संकलीत करण्यात आला.
राज्याच्या इतर भागांतून एकाच वेळी इतक्या मोठया संख्येने नागरिक नवी मुंबईमध्ये आल्याने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने दैनंदिन स्वच्छता कार्यात या भागात विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून 2 सप्टेंबर रोजी रात्रीपासून पहाटे 4 वाजेपर्यंत या भागात स्पेशल क्लिनींग ड्राईव्ह राबविण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सिडको एक्झिबिशन सेंटर व त्याचा परिसर तसेच से.30 वाशी आणि तुंगा हॉटेल आसपासचा परिसर आणि सायन पनवेल हायवे परिसर याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत 100 हून अधिक स्वच्छताकर्मी, स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक तसेच 2 यांत्रिकी सफाई मशीन, 3 सिव्हरेज जेटिंग मशीन तसेच कचरा संकलन व वाहतूक करणारी वाहने यांच्या माध्यमातून 21 टन इतक्या मोठया संख्येने कचरा संकलीत करण्यात आला व तुर्भे येथील प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. आंदोलन संपल्यानंतर तत्परतेने रात्रीच ही विशेष मोहीम हाती घेउुन पहाटे 4 पर्यंत अथक काम करुन दुस-या दिवसाचा सूर्य उगविण्यापूर्वीच हा संपूर्ण परिसर नेहमीसारखा स्वच्छ केल्याने त्या परिसरात मॉर्निंग वॉकला तसेच कामासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून महानगरपालिकेच्या तत्पर स्वच्छता कार्याची प्रशंसा करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai