माजी नगरसेवक हरेश केणी यांचा भाजपला रामराम
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 60
पनवेल : पनवेल महापालिकेमधील तळोजा परिसरातील माजी नगरसेवक हरेश केणी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपच्या विचारसरणीला रामराम ठोकला आहे. लीना गरड यांच्यावर भाजपने शिस्तभंगाची कार्यवाही केल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देणारे केणी हे दूसरे माजी नगरसेवक ठरले आहेत.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर पनवेल महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवून केणी यांनी महापालिका क्षेत्रात स्वताची छाप निर्माण केली. पनवेल महापालिकेच्या सत्तापटलावर विरोधी बाकावर शेकाप आणि काँग्रेस महाविकासआघाडीची सत्ता असल्याने शेकापकडून महापालिकेचे विरोधी पक्षनेता हे पद मिळण्याची चिन्हे संपल्यावर केणी यांनी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून भाजपचे कमळ हाती घेतले. शेकापला सोडचिठ्ठीवेळी त्यांच्यासोबत अजून काही सहकारी माजी नगरसेवक सुद्धा सोबत होते. तळोजा उपनगरात मुस्लिम बहुल वस्ती असल्याने गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या धार्मिक तेढ होणाऱ्या घटनांवेळी भाजपच्या राज्य व स्थानिक पातळीवरून घेतलेल्या भूमिकेमुळे केणी यांची कोंडी सातत्याने होत आहे. मतदार दुखावल्याचा धोका ओळखून भाजपपेक्षा इतर राजकीय पक्षातून महापालिकेची तळोजा उपनगराची निवडणूक लढवायची असल्याने केणी यांनी हा पवित्रा घेतल्याची चर्चा तळोजा परिसरात सुरू आहे. केणी यांनी त्यांचा राजीनामा थेट जिल्हाध्यक्ष आणि आ. ठाकूर यांच्याकडे सोपविण्याऐवजी तो विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सोपविला. केणी यांनी नवीन कोणता राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार याबाबत अदयाप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
पनवेल महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे तळोजातील रस्ते व पाणी समस्येसोबत मालमत्ता कराचा प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाही. तसेच वेळोवेळी भाजपच्या विचारसरणीमुळे घेतलेली भूमिका येथील तळोजातील जनतेला मान्य नसल्याची माझ्या समर्थकांचे म्हणने आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला अजूनही कोणत्या राजकीय पक्षासोबत जायचे असा कोणता निर्णय घेतलेला नसल्याचे केणी यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai