8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ चे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 237
17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम
मुंबई : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असून, सुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बाळाचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, नवनियुक्त मदतनीस व सेविका यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जनजागृतीसाठी 2018 पासून पोषण माह अभियान राबविण्यात येते. पोषण माह सप्ताहात दरवर्षी राज्य उत्कृष्ठ ठरले असून, यंदाही आपण समन्वयाने देशात उत्कृष्ठ काम करून, कुपोषण समूळ नष्ट करण्याकडे वाटचाल करूया.
सुपोषित राज्य करण्यासाठी अंगणवाडी महिलांचा मोठा सहभाग असून, यासाठी 18 हजार पदांची भरती करण्यात आली आहे. मातृवंदना योजना राबविण्यातही राज्य आघाडीवर असून, 63 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. सेविका आणि मदतनीस या पोषण आहाराच्या आधारस्तंभ असून, गावोगावी, घराघरात पोषण, आरोग्य आणि शिक्षण यांचा संदेश पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण भी पढाई भी’, अर्भक व बालक आहार पद्धती, शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणारे रेशन, बेबी किट, सुपोषित ग्राम पंचायत योजना, पोषण अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरजू महिलांना लाभ देण्यात येत आहे. तसेच त्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविका, मदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त(अंगणवाडी) कैलास पगारे यांनी राष्ट्रीय पोषण माह राज्यात एकूण 553 बाल विकास प्रकल्पातील एक लाख 10 हजार 629 केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 25 लाख 82 हजार 330 बालके, 3 ते 6 वयोगटातील 24 लाख 74 हजार 417 बालके, 4 लाख 32 हजार 234 गरोदर महिला व 4 लाख 23 हजार 756 स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र शासनाने पोषण माहसाठी सहा विशेष ‘थीम’ ठरविल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणा कमी करणे, अर्भक व बालक आहार पद्धती, पुरुषांचा बालकांच्या पोषण आणि आरोग्याच्या काळजीत सहभाग, वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती व डिजीटायझेशन या थीमनुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नव चेतना अभियान राबविण्यासाठी 37 हजार मदतनीस व सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानही याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. गतवर्षी गडचिरोली येथून या अभियानाचा शुभारंभ करून देशात राज्य अव्वल ठरले होते. यंदाही उत्कृष्ट कामगिरी बजाविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai