संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 145
नवी मुंबई : संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने गत 29 वर्षांपासून तसेच कोकणात 16 वर्षांपासून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना सेवासुविधा पुरवण्याचे कार्य करत आहे. कोकणातील खेड, दापोली, माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या तर काही विद्यार्थ्यांना गणवेश, दफ्तरे व एका शाळेत संगणक असे साहित्यांचे वाटप या संस्थेच्यावतीने करण्यात आले.
यावर्षी खेड तालुक्यातील 35 शाळांमध्ये, दापोली तालुक्यातील एक शाळा व माणगाव तालुक्यातील एक शाळा अशा 37 शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावकरवाडी या शाळेत संगणकाचे वाटप करण्यात आले.
संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी एस.एस. सी. व्याख्यानमाला, वह्या, संगणक व इतर शैक्षणिक साहित्य वाटप, गरजवंत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणा व गरीब महिलांना गृहउपयोगी साहित्यांचे वाटप असे उपक्रम राबविण्यात येत असतात. आगामी काळात कोकणातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱया (यूपीएससी, एमपीएससी) विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज अभ्यास केंद्र उभे करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai