पालिका कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे धडे
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 78
नवी मुंबई - आजच्या माहिती तंत्रयुगात कृत्रिम बुध्दीमत्तेने सर्वच क्षेत्रांना व्यापून टाकले असून एआयचा वापर दैनंदिन जीवनात व कामकाजात प्रभावीपणे करून कामात अधिक स्मार्टनेस आणण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एआय विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ () या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने महापालिका कर्मचा-यांना एआयचे प्रशिक्षण दिले जात असून या 2 दिवसीय 4 सत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सहा.आयुक्त श्री.प्रबोधन मवाडे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम व मुंबई विभागीय समन्वयक श्री.इंद्रनील मयेकर उपस्थित होते.
‘कृत्रिम बुध्दीमत्तेचा कार्यालयीन वापर’ या विषयावरील प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात परिमंडळ 1 अंतर्गत सर्व विभाग कार्यालये, समाजविकास विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग व विष्णुदास भावे नाटयगृह येथील कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री.विनायक कदम यांनी उपस्थितांशी संवाद साधत एआय चा जन्म व इतिहास इथपासून सुरुवात करत एआयचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले. एआयचा कार्यालयीन कामकाजात वापर करुन आपले काम अधिक सोपे व सुनियोजित कसे करता येईल याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.
दि.24 व 25 सप्टेंबर रोजी सकाळ व दुपार अशा दोन सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असून एकूण चार सत्रांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर करण्याविषयी प्रशिक्षित केले जाणार आहे. अत्यंत सोप्या पध्दतीने दिलेल्या या एआय प्रशिक्षणाचा उपयोग आम्हाला दैनंदिन कामकाजात टिप्पणी लेखन व इतर कामात करता येईल आणि याचा फायदा होईल असे अभिप्राय प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai