निसर्गोद्यानात 500 देशी वृक्षरोपांची लागवड
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 110
नवी मुंबई ः ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाच्या वतीने ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ संकल्पने अंतर्गत मोठया लोकसहभागातून कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात उत्साहाने राबविण्यात आला. यात वैविध्यपूर्ण 500 फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानातील हरित वैभवात भर पडावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्या परिसरात वृक्षदिंडी काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी पालिका अधिकाऱ्यांसमवेत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसमर्थ बैठक अध्यक्ष मोहन वेटा व इतर श्रीसदस्य, कोपरखैरणे वारकरी संप्रदाय ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सोपानबुवा महाराज, संत निरंकारी मिशनचे अध्यक्ष मनोहर सावंत त्यांचे इतर सहकारी सदस्य, स्थानिक मंडळे व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, नजिकच्या कॉन्सर्टो पेमेंट सिस्टिम महापे येथील व्यवस्थापक जितेश नायर व कर्मचारी, ख्राइस्ट अकॅडमी स्कूलचे शिक्षक अशाप्रकारे 500 हून अधिक वृक्षप्रेमी आणि 150 हून अधिक विद्यार्थ्यानी नी वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. प्रीती जोशी, ऐरोली यांनी वृक्षांच्या विविध कलाकृतींच्या रोपांचे वाटप केले. या वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने देशी वृक्षरोपे लागवडीवर भर देण्यात आला असून चिकू, फणस, जाम, पेरू, चिंच, सिताफळ, जांभूळ, आवळा, स्टार फ्रूट आणि आंबा यांसारख्या वैविध्यपूर्ण 500 फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या मातेची व मातृभूमीचे स्मरण करीत वृक्षारोपण केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai