पूरग्रस्तांच्या दुःख मुक्तीसाठी गोवर्धनी मातेचरणी प्रार्थना
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 160
शेतकऱ्यांना धैर्य आणि बळ मिळण्यासाठी नवचंडी होम
नवी मुंबई ः गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी आणि पुरामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पिकं जमीनदोस्त झाले असून जनावरे, घरे यांची मोठी होनी झाली आहे. आयुष्यभराची मेहनत काही तासांत वाहून गेली असून त्यांचे भविष्य संकटात सापडले आहे. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रावर ओढवलेले ओलं संकट दूर कर व शेतकऱ्यांना धैर्य, बळ आणि पुन्हा उभारी मिळावी यासाठी गोवधर्नी मातेसमोर सर्व गावकऱ्यांनी व पुजाऱ्यांनी मिळून मनोभावे होम-हवन करून प्रार्थना केली.
नवी मुंबईतील सुमारे 300 वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. तसेच नवरात्रीच्या नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेशा व चिमाजी अप्पांपासून 300 हून अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या आई गोवर्धनी माता मंदिर आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे. आई गोवर्धनी माता मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून तसेच या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धार 16 वर्षापूर्वी उद्योजक श्री. विजय नारायण म्हात्रे व आमदार मंदाताई म्हात्रे शुभहस्ते करण्यात आला होता. तसेच बुधवार 01 ऑक्टोबर 2025 रोजी आई गोवर्धनी माता मंदिरात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते आई गोवर्धनी मातेची पूजा अर्चा करून “नवचंडी होम” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमी वरती मंदिर परिसर जयघोष, मंत्रोच्चार व वेदघोषांनी दुमदुमून गेला. धार्मिक विधींनी वातावरणात दिव्यता, शांती व सकारात्मकतेचं अद्भुत तेज निर्माण झाले होते. निसर्गरम्य टेकडीवर व समुद्राने वेढलेल्या या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेत, महाप्रसादाचा लाभ घेतला. या विशेष धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आई गोवर्धनी मातेचे दर्शन घेतले. तसेच विविध धार्मिक विधी, होम-हवन आणि महाआरती पार पडली. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे साहेब यांनी देखील आई गोवर्धनी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत समाजसेवक पांडुरंग आमले, चिंतामण बेल्हेकर, उज्वला बेल्हेकर, कुंदन म्हात्रे, तेजस्वी म्हात्रे, कैलास म्हात्रे, सुजित कोळी, ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, सुर्यकांत म्हात्रे, हरी म्हात्रे, संतोष कोळी तसेच गोवर्धनी माता संस्थेचे पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai