उद्यान विभागातील कामगारांचे आमरण उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2025
- 163
पालिकेकडून किमान वेतन आणि लेव्ही मिळत नसल्याने आंदोलनाचा मार्ग; तीन दिवसांनंतरही दखल नाही
नवी मुंबई : पालिकेच्या उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि लेव्ही दिली जात नसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दसऱ्याच्या पुर्वसंध्येला या कामगारांनी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. तीन दिवस उलटून गेले तरीही पालिका प्रशासनाकडून कोणतीह दखल घेण्यात आलेली नाही.
नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय कार्य क्षेत्र क्षेत्रात एकूण 17 लाख 503 चौरस मीटर क्षेत्रफळात उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. या उद्यानात कार्यरत कामगारांना किमान वेतन आणि लेव्हीचे सर्व फायदे देणे बंधनकारक आहे पण उद्यान विभागातील ठेकेदारांशी, या विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हित संबंध असल्याने साधारण 40 कामगारांना किमान वेतन दिले जात नव्हते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समता समाज समता कामगार संघाने केला आहे.
महापालिकेच्या धोरणाप्रमाणे 2 हजार 200 चौरस मीटर साठी एक कामगार याप्रमाणे 17 लाख 503 क्षेत्रफळासाठी 773 कामगार कार्यरत असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र उद्यान विभागात साडे चारशे कामगार कार्यरत आहेत. त्यातच जे कामगार कामाला आहेत त्यांनाही किमान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जे कामगार उपोषणास बसले आहेत त्यांना दरमहा बारा हजार रुपयेच वेतन मिळते, जर महापालिका एका कामगारासाठी 27 हजार रुपये खर्च करत असेल आणि कामगाराला फक्त 12 हजार रुपये मिळत असतील तर उरलेले 15 हजार रुपये कोणाच्या खिशात जातात? असा प्रश्न संघाने उपस्थित केला आहे. एका कामगारांच्या मागे वर्षाला 150000 रुपयांची हेराफेरी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उद्यान विभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करून स्वत:चा खिसा गरम करून घेत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. वारंवार विनंती करूनही कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून या उपोषणात 25 कामगारांचे वय 60 वर्षे पेक्षा जास्त आहे. त्यांना मधुमेह उच्च रक्तदाब आणि इतर आजार आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत कधीही खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामगारांच्या वारसांना किमान वेतन आणि लेव्हीचे फायदे मिळत नसल्याने उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समाज समता कामगार संघाचे सचिव मंगेश लाड यांनी दिली. उपोषणाच्या मधील 20 कामगारांना सेवा निवृत्त करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या वारसांना किमान वेतन देण्यात येत नाही. केवळ 12000 पगार देण्यात येतो. मग उर्वरित रक्कम जाते कुठे असा प्रश्नही लाड यांनी विचारला आहे. आंदोलनाला बसलेले ज्येष्ठ मंडळी असून तीन दिवस उलटले तरी पालिकेकडून कोणतीच भुमिका घेतलेली नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai