30 जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान यात्रा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2025
- 106
इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनतर्फे विज्ञान यात्रेचे आयोजन
नवी मुंबई : महिलांच्या उन्नतीसाठी सामाजिक क्षेत्रात गत 52 वर्षांपासून कार्यरत असलेली राष्ट्रीय संस्था, इंडियन वुमन सायंटिस्ट्स असोसिएशन (आयडह्यूएसए) लवकरच रायगड जिह्यातील सुमारे 30 जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान यात्रा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधणारा कार्यक्रम राबविणार आहे.
विज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे आयडब्ल्यूएसएचे प्रमुख उद्दिष्ट असून या यात्रेअंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि संगणक विज्ञान यांतील रोचक संकल्पना प्रदर्शनी व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार असल्याचे आयडब्ल्यूएसएच्या अध्यक्षा ललिथा धारेश्वर यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी आयडब्ल्यूएसएने विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी नाविन्यपूर्ण पद्धत अवलंबली होती. या विज्ञान यात्रेसाठी विज्ञान मॉडेल्स बनविण्याकरिता इंडियन वुमन सायन्टिस्ट असोसिएशनने दिल्ली पब्लिक स्कूल, नेरुळच्या इयत्ता आठवी ते अकरावीतील 30 विद्यार्थ्यांकरिता इंटर्नशिप कार्यक्रम राबविला होता. दोन महिन्यांच्या इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे सहभागी विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल्स तयार केले आहेत. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला दोन आयडब्ल्यूएसए मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळाले असून तयार मॉडेल्स विज्ञान यात्रेसाठी वापरले जाणार आहेत.
दरम्यान, या इंटर्नशिपचा समारोप शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी आयडब्ल्यूएसए मुख्यालय, वाशी येथे होणार असून, विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स विज्ञान मॉडेल स्पर्धेत प्रदर्शित केली जाणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा आयडब्ल्यूएसएचा मानस आहे. विज्ञान मॉडेल स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विद्यार्थी ते विद्यार्थी या दृष्टिकोनातून शहरी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयडब्ल्यूएसएच्या अध्यक्षा ललिथा धारेश्वर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai